Fri, Jun 05, 2020 15:31
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › भुजबळ समर्थकांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

भुजबळ समर्थकांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

Published On: Feb 06 2018 5:54PM | Last Updated: Feb 06 2018 5:54PMनाशिक : प्रतिनिधी

राष्‍ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भूजबळ यांच्या समर्थकांनी भाजपचे जेष्‍ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे. यावेळी खडसे यांनी भूजबळ समर्थकांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, ‘‘एकाद्या व्यक्‍तिविषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर, त्याला न्याय मिळत नसतो.  

छगन भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ‘अन्याय पे चर्चा’ या कार्यक्रमा अंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. त्यातीलच एक भाग म्‍हणून मंगवारी भुजबळ समर्थकांनी खडसे यांच्या मुंबई येथील निवास्‍थानी  त्‍यांची भेट घेतली. यावेळी बापू भुजबळ, आ. जयवंतराव जाधव, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,  जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, कैलास मुदलियार, योगेश कमोद, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ, श्रीराम मंडळ, समाधान जेजुरकर, नरेंद्र सोनवणे यांनी छगन भुजबळांवर अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.  

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, ‘‘छगन भुजबळ हे बहुजन समाजासाठी काम करणारे नेते असून, त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगावी. एकाद्या व्यक्ती विषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर त्याला न्याय मिळत नसतो. मात्र, भुजबळ समर्थकांनी सुरु केलेल्या अन्याय पे चर्चेमधून समाजामध्ये जागृती निर्माण होईल. भुजबळांना कायद्याच्या चौकटीत न्याय मिळायला हवा.’’

मी भुजबळांसोबत : आ. भाई जयंत पाटील 
भुजबळ समर्थकांनी शेकापचे नेते आ. भाई जयंत पाटील यांची देखील भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी मी छगन भुजबळ यांच्या सोबत असून, मुंबईत होणाऱ्या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी भुजबळ समर्थकांना दिले.