Fri, May 29, 2020 08:35होमपेज › Nashik › व्यापारी पिता-पूत्रांना ७० लाखांचा गंडा 

व्यापारी पिता-पूत्रांना ७० लाखांचा गंडा 

Published On: Dec 04 2017 9:33AM | Last Updated: Dec 04 2017 11:37AM

बुकमार्क करा

जळगाव : प्रतिनिधी

भुसावळातील दोघा व्यापाऱ्यांकडून मकेची खरेदी केल्यानंतर तब्बल ७० लाख रुपये न दिल्याने व धनादेशन वटल्याने अहमदाबादस्थित अनिलस्टार्चप्रा.लि.कंपनीच्या चेअरमनसह दोघा संचालकां विरूध्द भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या व्यापाऱ्याची प्रथमच अशा पध्दतीने फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भुसावळच्या व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ येथील मक्याचे व्यापारी अमित अग्रवाल यांच्याकडील 32 लाख 83 हजार 393 रुपये किंमतीचा मका आरोपींनी खरेदी केला. सुरक्षेपोटी दिलेला धनादेश बँकेत वटवू नका, आरटीजीएसने पैसे अदा करू, असे सांगून फसवणूक करण्यात आली. तर, व्यापारी नरेंद्र (गुड्डू) अग्रवाल यांच्याकडीलही 36 लाख 61 हजार 408 रुपये किंमतीचा मका खरेदी करूनही आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने दोघा व्यापाऱ्यांनी रविवारी रात्री बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अहमदाबाद स्टार्चफॅक्टरीचे चेअरमन अमोल श्रीपालशेठ, संचालक श्वेतांग शैलेशभाई व शशीन मेहता यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.