Fri, Jul 10, 2020 07:33होमपेज › Nashik › कार झाडावर धडकली; एक ठार, तीन जखमी

कार झाडावर धडकली; एक ठार, तीन जखमी

Published On: Apr 02 2019 2:00AM | Last Updated: Apr 02 2019 12:40AM
इंदिरानगर : वार्ताहर

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील अन्नपूर्णा लॉन्ड्रीसमोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 1) पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डीफाटा येथील रहिवावासी असलेले किशोर जगताप हे आपल्या कुटुंबासमवेत इंडिगो कार (एमएच-2 बीटी-6541) ने वडाळी (शहादा) येथून नाशिकला येत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीवरून पाथर्डीफाट्याकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने अन्नपूर्णा लॉन्ड्रीसमोर त्यांची कार झाडावर धडकली. 

या अपघातात किशोर जगताप (45) हे जागीच ठार झाले तर त्यांची आई, पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.