Tue, Nov 19, 2019 16:01होमपेज › Nashik › नाशिकः कारची टायर फुटल्याने २ ठार

नाशिकः कारची टायर फुटल्याने २ ठार

Published On: Mar 02 2018 5:36PM | Last Updated: Mar 02 2018 5:36PMनाशिकः प्रतिनिधी

स्विफ्ट कारचे मागचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. विशाल लेकवाणी आणि हर्षद चंदानी अशी मृत दोघांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी, खामगाव येथून शिर्डीला देव दर्शनाला जात असताना स्विफ्ट कारचे मागील टायर अचानक फुटले. वेगात असताना टायर फुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या अपघातात २ जण जागीच ठार तर २ जण जखमी झाले. जखमींवर मनमाड येथे उपचार करण्यात येत आहेत. 

मनमाड-मालेगाव रस्त्यावर हा अपघात झाला. यामध्ये विशाल लेकवाणी आणि हर्षद चंदानी हे दोघे मयत झाले तर लखन आणि सनी केशवाणी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.