Mon, May 25, 2020 20:18होमपेज › Nashik › नंदुरबारमध्ये इंडिका-ट्रॅक्‍टरचा भीषण अपघात

नंदुरबारमध्ये इंडिका-ट्रॅक्‍टरचा भीषण अपघात

Published On: Dec 17 2017 4:05PM | Last Updated: Dec 17 2017 4:05PM

बुकमार्क करा

नंदुरबार : पुढारी ऑनलाईन

नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे इंडिका कार आणि ट्रॅक्‍टरचा भीषण अपघात झाला. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारचा चुराडा झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी दोघेजण गंभीर असून त्यांना उपचारासाठी धुळ्याला हालवण्यात आले आहे. 

विटा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्‍टरला इंडिका कारने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ग्रामस्‍थांनी मदतीला धावत जखमींना तातडीने रुग्‍णालयात दाखल केले. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.