Thu, Nov 14, 2019 01:05होमपेज › Nashik › अनैतिक संबंधातून भावानेच केला भावाचा खून 

अनैतिक संबंधातून भावानेच केला भावाचा खून 

Published On: Jul 24 2019 9:10PM | Last Updated: Jul 24 2019 9:10PM
नांदगांव : प्रतिनिधी 

नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील खुनाच्या घटनेचा उलघडा झाला आहे. अनैतिक संबधातुन भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. रफिक लतीफ शेख (वय २७, रा. माणीकपुंज, ता. नांदगांव) या तरुणाचा खून त्याचा सख्खाभाऊ तौफीक शेख व चुलत भाऊ सलमान शेख यांच्या मदतीने  केला पोलिस तपासात समोर आले आहे. 

या प्रकरणी तौफीक आणि त्याचा चुलत भाऊ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नांदगांव, मनमाड, मालेगांव येथील पोलिस नांदगांवमध्ये तळ ठोकुन होते. २२ जुलै रोजी या दोघांनी रफिकचा खून करुन पुरावे नष्ट केले होते .