Fri, Jun 05, 2020 06:32होमपेज › Nashik › शेंदूर्णी नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा 

शेंदूर्णी नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा 

Published On: Dec 10 2018 12:59PM | Last Updated: Dec 10 2018 12:59PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन

शेंदूर्णी नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी  नगर पंचायतची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. हा मतदार संघ भाजप मंत्री गिरीश महाजन यांचा आहे. पहिल्या नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या विजया खलसे विजयी झाल्या.