Tue, Jun 02, 2020 22:16होमपेज › Nashik › धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे यांचा राजीनामा

धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे यांचा राजीनामा

Published On: Apr 08 2019 5:41PM | Last Updated: Apr 08 2019 5:41PM
धुळे : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्षात गुंडांचे होणारे प्रवेश याला कंटाळून आपण राजीनामा दिल्याची भावना आमदार अनिल गोटे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केली आहे.

धुळ्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजपामध्ये गटबाजीला उधाण आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी करीत गुंड आणि खंडणीखोरांना प्रवेश देऊ नये, यासाठी पक्षनेतृत्वाकडे विरोध नोंदवला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष करीत ‘इन कमिंग’ सुरूच ठेवले. परिणामी, आमदार गोटे यांनी मनपा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. या काळात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आ. गोटे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.

त्यानंतर आ. गोटे यांनी मोदींना विरोध नसल्याचे सांगत मंत्री डॉ. भामरे यांच्या विरोधात लोकसभेसाठी उमेदवारदेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी (दि.8) त्यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. भारतीय जनता पक्षात आता सभ्य लोकांना जागा राहिलेली नाही. या पक्षात गुन्हेगार, खंडणीखोर यांना प्रवेश असल्याने आमच्यासारख्या नेत्यांना जागा उरली नाही. त्यामुळे अशा गुंडांसाठी आपण जागा रिकामी करून दिली आहे. या पक्षात मस्तवालपणे राजकारण करणारे देखील असल्याचा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.