Tue, Jun 02, 2020 13:29होमपेज › Nashik › रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: Mar 28 2019 5:20PM | Last Updated: Mar 28 2019 5:27PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार होते. मात्र, माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येऊन अर्ज  दाखल  करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. मध्यस्थी नंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव व भाजप रावेर येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी सागर पार्कवर भाजप समर्थकांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, भाजपचे 45 खासदार महाराष्ट्रतून निवडून येतील. भाजपविरुध्द ६० पक्ष एकत्रित झाले असल्याने सध्या देशाचे चित्र अतिशय विचित्र झाले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त सत्ता भोगणार्‍या काँग्रेसला ६० पक्षांना सोबत घ्यावे लागत आहे. अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला नसल्याचा टोलाही महायुतीच्या मेळाव्यात राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी विरोधकांना लगावला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेच्या उमेदवार खा. रक्षा खडसे, जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, आ. हरिभाऊ जावळे, बेटी बचाओ बेटी पढाओचे संयोजक राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष उदय वाघ,आ. संजय सावकारे, आ. चंदुलाल पटेल, आ. उन्मेश पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. रमेश पाटील, आ. चैनसुख संचेती, आ.आकाश फुंडकर,  माजी आ. चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. उज्वला पाटील, महापौर सिमा भोळे, माजी आ. साहेबराव पाटील, अस्मिता पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका ऍड. रोहीणी खडसे यांच्यासह सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. 

यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या,  की मी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे छोट्या मोठ्या चूक झाल्या असतील तरी देखील तुम्ही साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्या  देशाला  सक्षम पंतप्रधान  म्हणून मोदींना साथ द्यायची आहे