Fri, Nov 27, 2020 11:17होमपेज › Nashik › घड्याळ्याची टायमिंग चुकली तर खडसेंची धनुष्यबाण हाती घेण्याची तयारी?

घड्याळ्याची टायमिंग चुकली तर खडसेंची धनुष्यबाण हाती घेण्याची तयारी?

Last Updated: Oct 20 2020 8:40AM

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेजळगाव : पुढारी वृत्तसेवा

भाजपात डावलले गेलेलं एकनाथ खडसे यांनी गेल्या दोन- तीन वर्षांपासून आपल्या मनातील खदखद कधीच बाहेर काढली नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुख्यतः वाढदिवसांपासून खुले बोलण्यास प्रारंभ केला. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील कटुता बाहेर आली. यामुळे खडसे पक्ष सोडण्याच्या तयारीत, मुंबईत पवारांची भेट घेतली, अशा चर्चांना ऊत आला. मात्र मुहूर्तही ठरला आणि टळला. मात्र खडसे आहे तेथेच आहेत. फक्त जय श्री राम म्हणणाऱ्या खडसेंच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज येत नाही. यामुळे खडसे म्हणतात त्याप्रमाणे 'आज माझे  मनोरंजन होत आहे' असेच दिसतं आहे.

वाचा : शैक्षणिक वर्ष दोन महिने पुढे जाणार?

भाजपमधील एक दिग्गज नेते म्हणून एकनाथराव खडसे यांना ओळखले जाते. त्यांना महाराष्ट्र ओबीसीचे नेते म्हणूनही ओळख मिळालेली आहे. मात्र, गेल्या काळामध्ये भाजप सत्तेत असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर भाजप त्यांना अलगद बाजूला काढल्यासारखे वागू लागले. यानंतर खडसे यांनी अनेकदा आपली खंत बोलून दाखवली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. भाजपचे सरकार पुन्हा येऊ शकले नाही. खडसे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या मुलीचा पराभव झाला. या सर्वांची सल मनात खदखदत असताना खडसेंच्या पक्षांतराचा चर्चा होऊ लागल्या. खडसे यांनी कधीच याला होकार किंवा नकारही दिला नाही. त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत उत्तर देऊन नेहमीच पत्रकारांना निरुत्तर केले. खडसे यांचा वाढदिवस आल्यावर खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आणि आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळेच राजकारण होणार का अशी चर्चा सुरू झाली. याचदरम्यान खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईत चर्चा झाली. खडसे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात आली. मात्र, खडसेंनी यावर काहीच उत्तर दिले नाही. घटस्थापनेच्या दिवशी खडसे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात रावेर विश्रामगृहावर अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी वेगवेगळ्या वावड्या उठल्या. मात्र, त्यांनी रावेरला जाण्यापूर्वी पत्रकारांना जय श्रीराम म्हणून उत्तर दिले. यावरून खडसेंनी नेमके हातात घड्याळ किंवा हातात धनुष्यबाण घेणार हे कोणीच आजच्या घडीला सांगू शकत नाही. शंभर टक्के खडसे राष्ट्रवादीत येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. पण अशा बातम्यांनी माझे मनोरंजन होते, असे खडसे म्हणतात.

वाचा : जलसंधारण कार्यकारी अभियंता, अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

आजही राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वावड्या उठत असल्या तरीही खडसेंच्या मनात काय सुरू आहे  आणि ते पडद्यावर कोणता पिक्चर दाखवणार हे आज तरी  सांगणे कठीण आहे. ज्याप्रमाणे खडसे कोणते पाऊल उचलणार तसेच त्यांचे समर्थकही ह्या गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाहीत.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त जरी चुकला असला तरी जय श्रीराम करण्यासाठी दसरा मुहूर्त होऊ शकतो असाही अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे माजी मंत्री खडसे हे पक्षत्याग करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. नाथाभाऊंनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ही बातमी वाचून माझी पण करमणूक झाल्याचे सांगत हे वृत्त त्यांनी नाकारले.

वाचा : ठाकरे-फडणवीसांत कलगीतुरा!