Fri, Jun 05, 2020 05:03होमपेज › Nashik › नाशिकमध्ये भुजबळ कुटुंबियांचे मतदान (व्हिडिओ)

नाशिकमध्ये भुजबळ कुटुंबियांचे मतदान (व्हिडिओ)

Published On: Apr 29 2019 2:21PM | Last Updated: Apr 29 2019 2:21PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आज नाशिकच्या जुने सिडको परिसरातील ग्रामोदय विद्यालय या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, डॉ. जितेंद्र वाघ, मीनाताई भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ, दुर्गाताई वाघ यांनी मतदान केले. याच दरम्यान नागरिकांनी मतदार याद्यांमध्ये असलेल्या गोंधळ आणि मतदान केंद्रात झालेले बदल याबद्दल छगन भुजबळ यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. 

यावेळी छगन भुजबळ यांनी समस्या समजून घेतल्या. छगन भुजबळ नाराजी व्यक्त करत म्हणाले की, मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी अधिक सोयीचा व्यवस्था निवडणूक आयोगाकडून होणे अपेक्षित असते. मात्र या ठिकाणी एकाच कुटुंबियातील सदस्यांचे मतदान वेगवगळ्या केंद्रांवर गेल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून आपला मतदानाचा हक्क बजावत असलेल्या समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदार यादीतून गायब असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.