नाशिकः मनमाड(प्रतिनिधी)
आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील एका बंगल्यावर पोलिसांनी रात्री छापा मारून ही कारवाई केली. मात्र पोलिसांना चकवा देऊन तिघांनी तेथून पळ काढला. पकडण्यात आलेल्या दोघांच्याकडून १ लाख रूपयासह लॅपटॉप, काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाडमध्ये आयपीएल सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारून ही कारवाई केली.