Wed, Feb 19, 2020 04:19होमपेज › Nashik › लकी खैरणार यांच्या कारवर हल्‍ला 

लकी खैरणार यांच्या कारवर हल्‍ला 

Published On: Dec 18 2017 11:55PM | Last Updated: Dec 18 2017 11:55PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

अद्वय हिरे मित्र मंडळाचे अध्यक्ष लकी खैरणार यांच्या कारवर काही युवकांनी रात्री साडेदहाच्या सुमारास हल्ला केला. कँम्प रोडवरील वन विभागाच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला. हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा करत भाजप पदाधिकारी यांनी कारवाईसाठी रस्त्यावर ठिया मांडला. बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे (कॉंग्रेस) यांच्या विरोधातील अविश्वास ठरावासाठी एकत्र आलेली भाजप-शिवसेना १२ तास उलटण्यापुर्वीच टोकाच्या विरोधावर कायम झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. भाजप नेते डॉ. अद्वय हिरे यांनीच गील यांना ही कार (एम एच १२, एफ एफ ६७८) भेट दिल्याची चर्चा होती.