Fri, Jun 05, 2020 15:07
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › धन्य ते माता पिता! : सायकलवारीमध्ये अपघाती मृत्यू झालेल्या आठ वर्षीय मुलाचे देहदान करणार

धन्य ते माता पिता! : सायकलवारीमध्ये अपघाती मृत्यू झालेल्या आठ वर्षीय मुलाचे देहदान करणार

Published On: Jun 28 2019 6:02PM | Last Updated: Jun 28 2019 6:02PM
सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब येथून निघालेल्या राहिला सिन्नर सायकलिस्ट असोसिएशन यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. या ठिकाणी प्रेम निफाडे याला ट्रकने मागून चिरडले. यामध्ये तो जागीच ठार झाला. घटना घडली त्यावेळी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रेमचे आई-वडील या घटनास्थळी होते. ते तिघेही नाशिकवरून पंढरपूरकडे सायकलवरून निघाले होते.

नाशिक : पुढारी ऑनलाईन 

नाशिकमध्ये आज (ता.२८) हृदयद्रावक घटना घडली. सायकलवारीला प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या थोड्याच वेळात नऊ वर्षीय प्रेम नाफडे या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला. सिन्नर बायपास नजीक ही घटना घडली. प्रेम रायन इंटरनॅशनलमध्ये शिकत होता.

अधिक वाचा : सायकलवारीतील ८ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडले(व्हिडिओ)

सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब येथून निघालेल्या राहिला सिन्नर सायकलिस्ट असोसिएशन यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. या ठिकाणी प्रेम निफाडे याला ट्रकने मागून चिरडले. यामध्ये तो जागीच ठार झाला. घटना घडली त्यावेळी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रेमचे आई-वडील या घटनास्थळी होते. ते तिघेही नाशिकवरून पंढरपूरकडे सायकलवरून निघाले होते.

डोळ्यादेखत पोटच्या लेकराचा अपघात पाहिल्याने आई वडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज चिरणारा होता. आई वडिलांनी दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी प्रेमच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. सायकलवारीच्या आयोजकांनी प्रेमच्या आई वडिलांनी देहदानाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 

शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेमचे डोळे तसेच सुरक्षित भाग दान केले जाणार आहेत. प्रेमचा मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.