Fri, May 29, 2020 10:32होमपेज › Nashik › नाशिक : अनुराधा टॉकिजला भीषण आग (video)

नाशिक : अनुराधा टॉकिजला भीषण आग (video)

Published On: Aug 17 2019 12:10PM | Last Updated: Aug 17 2019 1:47PM

अनुराधा टॉकिजला भीषण आगचेहेडी (जि. नाशिक) : वार्ताहर 

नाशिक तालुक्यातील मनपा नाशिक रोड परिसरातील अनुराधा टॉकिजला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, कुठल्याही प्रकारची जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही.  

नाशिक रोड परिसरातील अनुराधा टॉकिज ही खूप जुनी टॉकिज असून बघ्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात होती. त्यामुळे मदत व बचाव कार्य अवघड झाले होते.