Thu, Jul 09, 2020 23:06होमपेज › Nashik › मालेगावात कोरोनाचा हाहाकार सुरुच; बाधितांचा आकडा २५३ वर

मालेगावात कोरोनाचा हाहाकार सुरुच

Last Updated: Apr 30 2020 12:16PM

संग्रहित छायाचित्रमालेगाव : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील कोरोना लॅब कार्यान्वित झाल्याने स्वॅब तपासणी जलद होऊन तत्काळ अहवाल प्राप्त होऊ लागले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्येने तब्बल २५३ चा टप्पा पार केल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मध्यरात्री २७ पॉझिटिव्ह अहवाल येऊन मालेगावातील एकूण बाधित संख्या तब्बल २५३ वर पोहोचली आहे. 

बुधवारी सायंकाळी ११ पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर साडे अकरा वाजता ६१ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४१ निगेटिव्ह तर २० पॉझिटिव्ह होते. काही वेळेतच ९१ रिपोर्ट जाहीर होऊन ७३ निगेटिव्ह तर २४ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. त्यानंतर मध्यरात्री आणखी २७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधितांची आकडेवारी २५३ वर गेली असून १५ मृत्यू व सात रुग्णांची घरवापसी झाली आहे.

नाशिकच्या नवीन लॅबमधून पहिले ६१ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णात १७ पुरुष व ३ महिला असून ते हकीमनगर, आझमीनगर, मौलाना हनिफ नगर, दत्तनगर, हकीमनगर, गुलशन ए इब्राहिम नगरचे रहिवासी आहेत. एलसीबी, बीडीडीएस, जळगाव पीएस, पोलिस मुख्यालयातील बंदोबस्तावरील पोलिसांचाही बाधितांमध्ये समावेश आहे. पाच वर्षीय बालिकापासून ५४ वर्षाच्या प्रोढ व्यक्तीला बाधा झाली.