Fri, Jun 05, 2020 06:38होमपेज › Nashik › दोन दिवसांत निविदा काढा; जि.प. मुख्याधिकार्‍यांचे आदेश

दोन दिवसांत निविदा काढा; जि.प. मुख्याधिकार्‍यांचे आदेश

Published On: Jul 17 2019 2:07AM | Last Updated: Jul 16 2019 11:12PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजनेतून सन 2018-19 मधील निधीतून जिल्ह्यातील 362 ग्रामपंचायतींना मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची ई निविदा 18 व 19 जुलै या दोन दिवसात ग्रामपंचायतीमार्फत प्रसिध्द करण्यात येणार असून  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गटविकास अधिका-यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेवून सूचना दिल्या.

जन सुविधांसाठी 15 कोटी 14 लक्ष 14 हजार रुपयांचे विशेष अनुदान वितरीत करण्यात आले. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकाम व स्मशानभूमीसंबंधी काम करण्यात येणार आहे. या सर्व कामांची ई निविदा ग्रामपंचायतींमार्फत प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासाठी 18 व 19 जुलै ही तारीख देण्यात आली असून जिल्हयातील संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींना जेवढया कामांचा निधी प्राप्त आहे तसेच ज्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त आहे अशा सर्व कामांच्या इ निविदा काढण्याबाबात गट विकास अधिका-यांना सुचना देयात आल्या. आजच्या आढावा बैठकीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हयाला शासनाने दिलेल्या अतिरिक्त शौचालय बांधकामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. सर्व तालुक्यांनी विहिती वेळेत शासनाने दिलेले उददीष्ट पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच कमी काम असलेल्या तालुकयातील ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी व विस्तार अधिका-यांसह जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी यावेळी दिले.