Wed, Jun 03, 2020 08:55होमपेज › Nashik › नाशिक: अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात युवक ठार

नाशिक: अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात युवक ठार

Published On: Jan 15 2019 10:17PM | Last Updated: Jan 15 2019 11:12PM
नाशिक : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील गंजमाळ परिसरातील भीमवाडी येथे अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू झाला. अरबाज शेरखान पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

अरबाज याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान अरबाजचा मृत्यू झाला. दरम्यान, अरबाजवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.