Mon, Jul 06, 2020 22:21होमपेज › Nashik › पारोळ्यातील स्वागत जन्मभर लक्षात ठेवेन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पारोळ्यातील स्वागत जन्मभर लक्षात ठेवेन : सीएम देवेंद्र फडणवीस 

Published On: Aug 23 2019 4:43PM | Last Updated: Aug 23 2019 4:43PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.२३) भाजपच्या महाजानादेश यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पारोळा शहरात महाजानादेश यात्रा सुरु आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारोळा येथे माझा स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असे मला अपेक्षित नव्हते, मात्र अपेक्षेपेक्षाही जंगी स्वागत तुम्ही केले असल्याने मी पारोळ्यातील स्वागत आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले. यावेळी जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आदी उपस्थित होते.

पारोळ्यातील पाणी प्रश्न आम्ही सोडविला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने आजपर्यंत केले नाही तेवढे काम पाच वर्षात केले. तसेच पाच वर्षांतील काम तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या यात्रेचे नियोजन केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुन्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणायचे आहे त्यासाठी तुमचा जनादेश आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धरणगावात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पारोळा, अमळनेर येथुन मुख्यमंत्री धरणगावात पोहचले आहेत. पारोळा व अमळनेर येथे महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील,पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार आदींसह अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे जळगाव, भुसावळ आणि जामनेर येथे सभा घेणार आहेत.