Sat, Aug 08, 2020 02:46होमपेज › Nashik › पालकमंत्र्यांना टाळून येवल्याच्या विकासासाठी बैठक!

पालकमंत्र्यांना टाळून येवल्याच्या विकासासाठी बैठक!

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:30PMयेवला : अविनाश पाटील

स्वपक्षातील पदाधिकार्‍यांच्या पक्ष हिताविरुद्ध असलेल्या वागणुकीमुळे पालकमंत्री येवल्याकडे दुर्लक्ष करतात असेही बोलले गेले. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांच्या कारागृहातून पाठवलेल्या पत्रानुसार केलेल्या खास सुचनेचे पालन करीत भाजपशासीत येवला नगरपरिषद क्षेत्रातील  प्रलंबित विकासकामांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे अन् या बैठकीला जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या ना.गिरिष महाजन यांना चक्क टाळले असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपची सत्ता असल्याने येवलेकरांनी भाजपला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. मात्र, गेल्या वर्षभरात भाजपाकडून दिलेली आश्‍वासने विकासाचे मुद्दे तसेच्या तसेच राहीले गेले तर गाळेधारकांना दिलेला पुनर्वसनाचा शब्द हा हवेतच विरला गेला. स्विकृत नगरसेवकाच्या निवडीमध्ये झालेल्या गडबडीमुळे येवलेकरांच्या विकासाला खिळ बसली. वर्षभरात जी कामे झाली ती राष्ट्रवादीच्या काळातील मंजुरी व निधी मिळवलेली होती. येवला शहराच्या विविध विकासकामांसाठी भाजपच्या नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विविध मंत्र्याची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या काळात सुरु झालेल्या भुयारी गटारीसारख्या कामांना गती देण्याचे प्रयत्न केले गेले. भाजपा नगराध्यक्षाकडून नविन काहीही विकासकामे होत नसल्याने जनतेत नाराजीचा सुर उमटत आहे. नगराध्यक्षांनी त्याचवेळी पालकमंत्र्याचे ऐकले असते तर आज हे दिवस आले नसते असे जाणकार आज बोलत आहे. गुरुवारी (दि.1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता आमदार जयवंतराव जाधव, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, राष्ट्रवादीचे गटनेते डॉ.संकेत शिंदे, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, अपक्ष गटनेते रुपेश लोणारी यांचेसह मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, पर्यटन, पाटबंधारे, प्रदुषण, नगररचना, नियोजन, भुमि अभिलेख या विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे. बैठकीमध्ये स्वातंत्र्यसेनानी तात्याटोपे स्मारक, येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनास प्रस्ताव सादर करणे, नगरपालिका क्षेत्रातील यात्रास्ळ विकास कार्यक्रमासाठी अनुदान योजनेतून राजे रघुजीबाबा स्मारक या स्ळाचा विकासाठी निधी मिळण्याकरीता प्रस्ताव, गंगासागर तलावाच्या प्रयावरण संवर्धनासाठी राज्यसरोवर संवर्धन योजनेतून निधी मिळण्याकरीता प्रस्ताव करणे यावर चर्चा होणार असल्याचेही समजते.

एलईडी घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीसह इतरांनी केलेल्या आरोपाची जिल्हाधिकारी यांच्या समितीने चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. मात्र, त्या अहवालामध्ये काय नमूद आहे? त्यातून काय निष्पन्‍न झाले हे गुलदस्त्यातच राहिलेले आहे. या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकार्‍यांकडे राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या गटनेत्यांकडून जिल्हाधिकारी यांना या बैठकीतच या चौकशी अहवालाबाबत विचारणा होणार असल्याचीही चर्चा शहरामध्ये सुरु आहे.