Mon, Jul 06, 2020 22:12होमपेज › Nashik › गणेश विसर्जन करताना नाशिक येथील तरूण बुडाला

गणेश विसर्जन करताना नाशिक येथील तरूण बुडाला

Published On: Sep 12 2019 8:43PM | Last Updated: Sep 12 2019 10:31PM
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे गणेश विसर्जनासाठी नाशिकहून आलेला युवक युवराज राठोड (वय २८, दत्त नगर अंबड, नाशिक) हा बुडाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, या घटनेने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.

नाशिक येथील हा युवक आपल्या मित्रांसोबत गणपती विसर्जन करण्यासाठी आला होता. परंतु, गणपती बुडवत असताना  पाण्याचा अंदाज न आल्याने युवक बुडल्याची घटना घडली आहे. 

मागील वर्षी याच तलावात दोन तरुण बुडाले होते,  यावर्षी ही अशीच पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनाच्या बंदोबस्तावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

बुडालेल्या युवकाचा अजूनही शोध चालूच आहे. स्थानिकांच्यामदतीने शोध कार्य सूरु आहे. या परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते भाऊराव डगळे लक्ष ठेवून आहेत.