Fri, May 29, 2020 09:39होमपेज › Nashik › पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ; दंडाची रक्कम घेतल्याचा दावा

पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ; दंडाची रक्कम घेतल्याचा दावा

Published On: Sep 05 2019 1:42AM | Last Updated: Sep 05 2019 12:03AM
नाशिकरोड : वार्ताहर

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिंदे टोलनाक्यावर दुचाकीस्वाराकडून पैसे घेतानाची चित्रफीत बुधवारी (दि.4) सकाळपासून व्हाट्सअ‍ॅप व फेसबुकवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ असलेल्या टोलनाक्यावर  एका  दुचाकीस्वाराची अडवणूक करून कागदपत्रे, हेल्मेट तपासणी नावावर 100 रुपये घेतानाचा नाशिकरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहायक उपनिरीक्षक एस. पी. कदम  यांचा चित्रफीत व्हायरल झाल्याने नाशिकरोड परिसरात व सोशल मीडियावर चांगला हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कदम यांचा कार्यकाळ  लवकर संपणार असल्याने त्यांंंच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.