Fri, Jul 10, 2020 21:07होमपेज › Nashik › कीटकनाशक फवारणीमुळे मातोरीत शेतकर्‍याचा बळी

कीटकनाशक फवारणीमुळे मातोरीत शेतकर्‍याचा बळी

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:35AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे नाशिक तालुक्यातील मातोरी गावातील शेतकर्‍याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली. निवृत्ती दामू पिंगळे (60) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 8) उपचारादरम्यान या शेतकर्‍याचा  मृत्यू झाला. 

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे. पिंगळे शुक्रवारी पिकांवर कीटकनाशक फवारणी करत होते. यावेळी औषध फवारणी करताना त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांचा मुलगा रमेश याने वडिलांना दुपारी दीडच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.