Mon, Jun 01, 2020 07:18होमपेज › Nashik › अवैध मद्यसाठ्यासह अंबोलीत वाहन जप्त

अवैध मद्यसाठ्यासह अंबोलीत वाहन जप्त

Last Updated: Oct 10 2019 11:26PM
नाशिक : प्रतिनिधी

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत आहेत. दादरा नगर हवेली या केंद्रशासित भागात विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा नाशिक जिल्ह्यात आणणार्‍या संशयितांचा विभागाने छडा लावला. मात्र विभागाची चाहूल लागताच संशयितांनी मद्यसाठा आणि वाहन सोडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिकअप वाहनासह 8 लाख 17 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

गांधी सप्ताहात विजया दशमीच्या दिवशी दादरा नगर हवेली येथे विक्रीस असलेला मद्यसाठा नाशिकच्या सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि.8) तीन पथकांच्या माध्यमातून अंबोली चेक पोस्ट येथे वाहन तपासणी करण्यात आली. 

मात्र तपासणी सुरु असल्याचे लक्षात येताच चेक पोस्ट परिसरात संशयितांनी त्यांच्याकडील वाहन तेथेच सोडून पळ काढला.  रस्त्यावर बेवारस उभ्या असलेल्या एमएच 04 जीआर 0193 क्रमांकाच्या पिकअपची तपासणी केली असता त्यात मद्य साठा आढळला. त्यामुळे पथकाने वाहनासह सुमारे 8 लाख 17 हजार 40 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.