होमपेज › Nashik › उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य : खोतकर 

उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य : खोतकर 

Published On: Feb 24 2019 4:48PM | Last Updated: Feb 24 2019 4:48PM




व्दारका (जि. नाशिक): वार्ताहर 

जालना मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्‍या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी  असल्‍याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे. परंतु, राज्‍यात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने खोतकर हे लोकसभा निवडणूक लढणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्‍थित होत आहे.  

रविवारी (दि २४) नाशिक दौरावर आलेल्‍या खोतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी मतदार संघातील नागरिकांच्या मागणीनुसार मी लोकसभा निवडणूक लढणार असल्‍याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव  ठाकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे खोतकर यानी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसकडून तिकीटाची  ऑफर मिळालेली असल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी विचारले असता खोतकर म्हणाले,  जो काम करतो त्याला सगळीकडे मागणी असते. मात्र मी शिवसैनिक आहे, उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.