Sun, Jul 05, 2020 16:10होमपेज › Nashik › दुचाकी-कार अपघातात दोन परप्रांतीय कामगार ठार

दुचाकी-कार अपघातात दोन परप्रांतीय कामगार ठार

Published On: Dec 29 2018 1:53AM | Last Updated: Dec 29 2018 1:33AM
म्हसरुळ : वार्ताहर

दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन कामगार ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.27) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ घडली. 

कार्तिक त्रिनाथ परिडा (24) व विजयकुमार गोलक परिडा (29) अशी मृतांची नावे आहे. पुरी (ओडिशा) येथील परिडा बंधू दिंडोरी तालुक्यातील एका स्टील कंपनीतील कामगार आहे. परिडा हे दुचाकीने (एमएच 15, एफएक्स 6902) नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने जात होते. त्याच सुमारास आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ समोरून भरधाव येणार्‍या हुंडाई वरणा कारने (एमएच 15, डीसी 9119) परिडा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कार्तिक आणि विजयकुमार यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपाचारापूर्वीच दोघांचाही प्राणज्योत मालवली. अपघातात कारचालक शहा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी निरंजन जटेश्‍वर स्वाइ यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक एस.आर. पाटील अधिक तपास करत आहेत.