Fri, Jun 05, 2020 14:19होमपेज › Nashik › उकळते पाणी पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू

उकळते पाणी पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू

Published On: Aug 21 2019 1:35AM | Last Updated: Aug 20 2019 10:55PM
जानोरी : वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीमधील एमआयटीसी रोलिंग मिल प्रायव्हेट या लोखंडी सळई तयार करणार्‍या कंपनीत कामगारांच्या अंगावर लोखंडाचे उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीत एमआयटीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लोखंडाचे पाणी तयार करून त्यापासून लोखंडी सळई बनविण्याचे काम सुरू असताना, उकळते पाणी अंगावर पडल्याने कोमलकुमार भुलैई गौतम (21) हा जागीच ठार झाला असून, प्रमोद गुप्तेश्‍वर पासवाल (32) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भुपेंद्र लोरिक प्रसाद (20)हा गंभीर भाजलेला आहे.

याबाबत दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस हवालदार दिलीप पगार आदी तपास करीत आहेत.