Fri, Jun 05, 2020 16:09
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : गाड्या पेटवण्याचे लोन आता ग्रामीण भागातही 

नाशिक : गाड्या पेटवण्याचे लोन आता ग्रामीण भागातही 

Published On: Jan 13 2019 7:20PM | Last Updated: Jan 13 2019 7:20PM
लासलगाव : प्रतिनिधी

गाड्या जाळण्याचे लोन नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही पसरले आहे. गाड्या जाळण्याचा प्रकार लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथेही घडला.  वाकडा येथे दोन मोटर सायकल जाळल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  भागवत एकनाथ दरेकर ( निमगाव वाकडा) यांच्या घरासमोर लावलेल्या मोटरसायकल ( एम ए डब्ल्यू 8039 एमएच 15 बीटी 5006) अशा दोन दुचाकी लावलेल होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने दुचाकीचे पेट्रोल टाकीचे नळी काढली. त्यानंतर काढलेले पेट्रोल गाडीवर ओतले आणि  दोन्ही दुचाकींना आग लावली. या आगीत दोन्ही दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मोहरे तपास करत आहे.