Sun, Aug 09, 2020 01:49होमपेज › Nashik › अमरावती : सेवाग्राम ते नागपूर शिक्षकांची पायीदिंडी

अमरावती : सेवाग्राम ते नागपूर शिक्षकांची पायीदिंडी

Last Updated: Dec 13 2019 5:41PM

वर्धा ते नागपूर पायीदिंडीची सुरूवातअमरावती : प्रतिनीधी

जुन्या पेन्शन योजना मिळावी या करिता महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम येथून वर्धा ते नागपूर पायीदिंडीची १२ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ही दिंडी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. यासोबत पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत, कोकण मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे हे आहेत.

दिंडीतील सर्व शिक्षक आमदार आणि हजारो शिक्षक पायदळ दिंडीच्या पहिल्याच दिवशी सेवाग्राम वर्धा येथून पुढे २१ किलोमीटर चालत जावून सेलू येथील भोयर कॉलेजात मुक्कम केला. त्यानंतर दिंडीच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी आठ वाजता सेलू येथील वर्धा जिल्हातील शेकडो शिक्षकांनी पायदळ दिंडीला पाठिंबा दर्शवला.  

यानंतर सेलू येथून पुढे जात असताना सोलापूर जिल्हातील तावशे गावातील शिक्षक बंडू ज्ञानदेव सावंत यांना रस्त्यात भोवळ  येऊन पडले. तेव्हा उपस्थित आमदारांनी बंडू यांना वर्धा येथील डॉ. चौधरी यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यानंतर पुढे दिंडी २२ किलोमीटर चालून सावंगा आसोला येथील श्रीकृष्ण हायस्कुल येथे मुक्काम करणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता सावंगा वरुन निघून ही दिंडी बुट्टी बोरी मार्गे डोंगरगाव येथे मुक्काम करणार आहे. दि. १५ डिसेंबरला नागपुर येथील छत्रपती चौकातील शाळेमधे ही दिंडी मुक्काम करणार आहे. यानंतर सोमवारी सकाळी विधानभवनावर पायदळ दिंडीतील आमदार आणि हजारो शिक्षक घेवून धडकणार आहे. असे माध्यमांशी बोलताना नाशिक शिक्षक मतदार सघाचे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले आहे. 

एक नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा १०० टक्के अनुदानित नसल्याने, जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केल्याने, शिक्षकांच्या असंतोषामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सेवाग्राम वर्धा ते नागपूर पायी दिंडी आंदोलनाला गांधींच्या सेवाग्राम येथून उपाध्यक्ष शिक्षण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातून कर्मचारी आज वर्धेतील सेवाग्राम येथे हजारोच्या संख्येने सहभागी नोदविली. या वर्धा- नागपूर पायी दिंडीत आ. प्रा. श्रीकांत देशपांडे (राज्यमंत्री दर्जा, उपाध्यक्ष शिक्षण हक्क परिषद राज्य), नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, कोकण विभागाचे आ. बाळाराम पाटील आणि पुणे विभागाचे आ. दत्तात्रय सावंत सहभागी झाले. यासोबत शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी रविंद्र सोळंके, विभागीय प्रसिद्धी प्रमुख शिक्षक आघाडी, धामणगाव तालुकाध्यक्ष सुनिल जिवतोडे, मंगरुळ तालुकाध्यक्ष सुधीर ठाकरे, स्वियसहाय्यक पराग गनथडे, व्यवस्थापक अमोल सिरसाठ, सोनू धारवाडे, नितीन राऊत, कल्याण बर्डे (पुणे जिल्हाध्यक्ष), आनंतराव गर्जे (पुणे जिल्हा सचिव), डॉ. रविंद्र पानसरे (कार्याध्यक्ष पुणे), विजय येवले (सातारा जिल्हाध्यक्ष), सचिन नेलवडे (जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ), सुधाकर चव्हाण (सहसचिव सतारा), रामचंद्र मोहिते (उपाध्यक्ष), समाधान घाडगे (राज्य संघटक), मारुती गायकवाड (कार्याध्यक्ष), शंकर वडने (संपर्क प्रमुख), प्रमोद देशमुख (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), मुकंद मोहीते (चेअरमन सोलापूर पतसंस्था), कोकण विभागातील रुपेश मात्रे, किशोर पाटील, रामचंद्र देशमुख असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.