Tue, Nov 12, 2019 20:55
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बोरटेंभेत तीन घरफोड्या; नागरिकांमध्ये दहशत

बोरटेंभेत तीन घरफोड्या; नागरिकांमध्ये दहशत

Published On: Oct 03 2019 2:12AM | Last Updated: Oct 03 2019 12:45AM
इगतपुरी : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी दरोडा टाकला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात ताईबाई आडोळे या महिलेच्या घरात घुसून तिला जबर मारहाण करीत तिच्या कानातील दोन झुबे, गळ्यातील मनचली हार पळवला. दुसर्‍या घटनेत नवनाथ आडोळे यांच्या पाकिटातील 1,700 रुपये, तिसर्‍या घटनेत शिवाजी विठ्ठल आरशेंडे यांच्या घरातील कपाटातून 1,600 रुपये व चार तोळे वजनाचे पायातील जोडवे चोरून नेले. यातील ताईबाई आडोळे यांना गंभीर मारहाण केल्याने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अरुधंती राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी डॉगस्कॉड आणून तपासणी करण्यात आली. तसेच, गुन्हे शाखेच्या स्थानिक पथकाने महामार्गावरील पेट्रोलपंपावरील व घोटी टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत माहिती घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अरुधंती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे तपास करीत आहे.