Sat, Jul 04, 2020 21:04होमपेज › Nashik › सहा दुचाकींसह चोरटा अटकेत

सहा दुचाकींसह चोरटा अटकेत

Published On: Sep 09 2019 1:33AM | Last Updated: Sep 08 2019 11:20PM
मालेगाव : वार्ताहर

शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणार्‍या चोरट्यास छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. छावणी पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणांहून बर्‍याच दुचाकी चोरीस गेल्या असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस नाईक अविनाश राठोड, महेश गवळी, पंकज भोये, नितीन बारहाते, नरेंद्रकुमार कोळी, संजय पाटील, संदीप राठोड, सचिन गांगुर्डे यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अट्टल दुचाकीचोर नकुल दीपक पवार (रा. खडकी हल्ली मु. उमराणे) हा मोसमपूल परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले

. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरट्याने शहरातील विविध भागांतून चोरलेल्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यातील तीन दुचाकी छावणी पोलीस ठाणे हद्दीतील तर उर्वरित तीन दुचाकी इतर पोलीस ठाणे हद्दीतील आहेत. पथकाने छावणी पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडीस आणले आहेत. या जप्त सहा दुचाकी धरून आत्तापर्यंत एकूण 48 दुचाकी पथकाने जप्त करून आरोपींना अटक केली आहे.

पाच जण तालुक्यातून हद्दपार

दाभाडीसह रोकडोबानगर येथील दादाजी काळू सुपारे, यमुनाबाई बबन सुपारे, बंडू महादू गांगुर्डे, दत्तू पोपट खैरनार, नबाबाई छबू माळी या पाच जणांना प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या आदेशान्वये गणेशोत्सव कालावधीपर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रवीण वाडिले पोलीस निरीक्षक छावणी पोलीस ठाणे, मालेगाव.