Tue, Jun 02, 2020 13:59होमपेज › Nashik › नाशिक : सोन्याचा भावाच्या कांद्यावर चोरट्यांचा डल्ला!

नाशिक : सोन्याचा भावाच्या कांद्यावर चोरट्यांचा डल्ला!

Published On: Sep 23 2019 4:33PM | Last Updated: Sep 23 2019 4:26PM

संग्रहित छायाचित्र कळवण : प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील मोकभनगी येथील शेतकरी राहुल बाजीराव पगार यांच्या शेतातील कांद्यावर रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. कांद्याला सोन्याचा भाव आल्याने आता चोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे, अशी म्हणायची वेळ आली आहे.

नाशिकच्या कळवण तालुक्यातील मोकभनगी शिवारात राहुल यांचा ९० हजार रुपयांचा कांदा व पर कॅरेट ११७ असे एकूण १ लाख १ हजार ७९० रुपयांची चोरी झाली. राहुल पगार या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करत कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी २५ क्विंटल ७४ किलो कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला. मात्र, या शेतकऱ्यांच्या कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. 

कळवण पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.