Fri, Jun 05, 2020 18:47होमपेज › Nashik › 'राममंदिर होईपर्यंत सेना स्वस्थ बसणार नाही'

'राममंदिर होईपर्यंत सेना स्वस्थ बसणार नाही'

Published On: Jun 15 2019 1:50AM | Last Updated: Jun 15 2019 12:51AM
नाशिक : प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदार, पदाधिकार्‍यांसमवेत 16 जूनला अयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. अयोध्यातील राममंदिर हा हिंदू धर्मीयांचा भावनिक प्रश्‍न आहे. त्यामुळे मंदिर पूर्ण होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अंबड येथील अग्निशमन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ना. देसाई पत्रकारांशी बोलत होते. अयोध्येत राममंदिर व्हावे, ही देशवासीयांची अनेक वर्षार्ंपासूनची इच्छा आहे. श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेची प्रारंभापासून आग्रही भूमिका राहिली आहे. त्यामुळे मंदिरासाठी शिवसेनेचा शेवटपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.  या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांचा हा दौरा आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे पुढील पाच वर्षे आर्थिक विकासाची ठरणार आहे. भारतात परकीय चलन आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच जाहीर केला आहे. परिणामी पहिल्या 20 देशांच्या रांगेत भारताचा समावेश झाला आहे.