Fri, Jun 05, 2020 18:18होमपेज › Nashik › मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरुवात

Published On: Aug 22 2019 9:52PM | Last Updated: Aug 22 2019 9:52PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरुवातधुळे : प्रतिनिधी 

केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार अतिवृष्टी, दुष्काळ अशा अनेक संकटात नेहमी शेतक-यांच्या पाठीशी राहीले आहे. या पाच वर्षांच्या काळात सरकारने वेगवेगळया माध्यमातुन शेतक-यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. महाराष्टाने या पाच वर्षांच्या काळात देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सरस काम केले आहे. जनतेने दिलेला जनादेश सार्थकी लावण्याचे काम या सरकारने केले असल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

धुळे जिल्हयातुन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरुवात केली. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन होणार होते. पण नियोजित वेळे पेक्षा उशीराने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाजनादेश यात्रेची विषेश बस व गाडयांचा ताफा चाळीसगाव रोड चौफुलीवर आल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्याचे नियोजन कार्यकत्यांनी केले होते. पण यात्रेस झालेला विलंब पहाता पुतळयास माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांनी पुष्प हार अर्पण केला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गाडीच्या टपावरुनच पुतळयाचे दर्शन घेतले. 

यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोहयोमंत्री जयकुमार रावल, भाजपाचे महानगरअध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीणचे बबन चौधरी यांची उपस्थिती होती. ही यात्रा जुना आग्रा रोड मार्गे नगावबारी चौफुलीपर्यंत नेण्यात आली. सुमारे सहा ते सात किलोमिटरच्या या अंतरात रस्त्याच्या कडेला तसेच ईमारतींवर उभ्या असलेल्या जनतेला मुख्यमंत्री यांनी अभिवादन केले. तर खंडेराव बाजार, पाचकंदील चौकात कार्यकत्यांनी पुष्पहार व गुच्छ देवुन मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. पंचवटी, दत्तमंदीर चौक तसेच अनेक ठिकाणी ईमारतींवरुन मुख्यमंत्री यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

यानंतर ही यात्रा दोंडाईचा शहराकडे रवाना झाली. या दरम्यान नगाव, सोनगीर येथे कार्यकत्यांनी मुख्यमंत्री यांच्या यात्रेचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षापुर्वी जनतेने जनादेश दिल्याचे आभार मानतांनाच या जनादेशाचे आपण सार्थक लावले आहे. असे सांगीतले. पाच वर्षांपुर्वी जनतेच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आले. त्यापाठोपाठ राज्यात देखील विधानसभेवर भाजपाचा झेडा लागला. या पाच वर्षाच्या काळात भाजपाच्या सरकारच्या माध्यमातुन जनतेच्या जिवनात परीवर्तन करण्याचे काम केले आहे. या राज्यात हजारो कोटी रुपये खर्च करुन रस्त्याचे काम केले आहे. 

राज्यातील शेतकरी अतिवृटी व दुष्काळासारख्या परीस्थितीमुळे अडचणीत आला. पण सरकार शेतकरी व शेतमजुरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीले. यासाठी वेगवेगळया संकटाच्या वेळी शेतकरी बांधवांना 50 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. महाराष्टाने उदयोग, आरोग्य व सर्वच क्षेत्रात अन्य राज्यांना मागे टाकले आहे. ही विकासाची घोडदौड पुन्हा जनादेश मिळाल्यानंतर देखिल अशीच सुरु रहाणार आहे. 

धुळे जिल्हयातील सुळवाडे जामफळ हा प्रकल्प प्रलंबीत असल्याने शेतकरी बांधवांना त्रास होत असल्याचे भाजपाने हेरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठी हजारो कोटी रुपये दिले आहेत. आता या योजनेचे काम सुरु झाले असुन धुळे तालुक्यासह शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना या योजनेचा फायदा होणार आहे. 

सरकारने दिलेला हा जनादेश सार्थकी लावुन केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही यात्रा काढली असुन पुन्हा आपण आपणास जनादेश देणार आहात काय, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला विचारला. यावेळी कार्यकत्यांनी जनादेश देणार असल्याचा विश्वास दिला. जनतेचा हा विश्वास घेवुन आपण  मुंबई मधे जाणार असुन पुन्हा जनतेने भाजपाचा झेडा विधानसभेवर फडकवावा, असे आवाहन करतांनाच पुन्हा सोनगीर येथील हॉटेलमधे आपण चहा पिण्यासाठी येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

महाजनादेश यात्रेची सुरुवात उशीराने झाल्याने वाहनांचा वेग वाढविण्यात आला हेाता. या यात्रेच्या दरम्यान पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधिक्षक डॉ राजू भुजबळ , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी पोलिसांचा ताफा बंदोबसतासाठी लावला होता. यात्रेच्या काळात या सर्व अधिका-यांना सात किलोमिटरचे रपेट मारावी लागली. तर कार्यकत्यांना बसच्या समोरुन बाजूला करतांना नाकीनउ आले. ही यात्रा दोंडाईचाकडे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

पुर ग्रस्तांसाठी मर्चंट बँकेकडुन मदतीचा धनादेश

कोल्हापूर, सांगली येथील महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 11 लाखाचा धनादेश दिला. बँकेचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांनी आज गोंदूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे धनादेश सुपूर्त केला.

येवल्याचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्याकडून 1 लाख 11 हजार रुपयांचा, सिध्दी विनायक पतसंस्था रविवार कारंजा, नाशिक यांच्याकडून 51 हजार रुपये तर रविवार कारंजा  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाशिक कडून 31 हजाराचे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केले.  

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र पवार, जनसंपर्क संचालक कांतीलाल जैन, माजी आमदार तथा संचालक सर्वश्री वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, प्रफुल संचेती, गणेश गिते, रंजन ठाकरे आदि उपस्थित होते.