Thu, Jul 09, 2020 23:24होमपेज › Nashik › जळगाव : कैद्याकडून पोलिसांना बेदम मारहाण

जळगाव : कैद्याकडून पोलिसांना बेदम मारहाण

Last Updated: Feb 24 2020 9:01AM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात आणलेल्या एका कैद्याने अचानक वेडसर सारखा व्यवहार करीत पोलिस कर्मचार्‍यांसह नागरिकांना मारहाण करायला सुरूवात केल्याचा प्रकार रविवारी घडला. लकड्या आसाराम पावरा (वय 23, मुळ रा.खरगोन, मध्य प्रदेश) असे या कैद्याचे नाव आहे.

रविवारी दुपारी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुख्यालयातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश रघुनाथ पाटील (वय 56) व शेख सलीम शेख करीम (वय 51) या दोघांनी दुचाकीवरून पावराला रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समोर केसपेपर भरत असतानाच त्याने मनोरुग्णासारखे हावभाव करण्यास सुरूवात केली. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी लागलीच पळ काढला. यानंतर राजेश पाटील व शेख सलीम या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट दोन्ही पोलिसांवर हल्ला चढवला.

हातातील लोखंडी बेडीने त्यांच्यावर वार केले. यानंतर पाटील यांचे शर्ट फाडून मारहाण सुरू केली त्यांना चावा घेतला. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खोलीत सुमारे दीड तास हा थरार सुरू होता. जिल्हापेठचे नाना तायडे, शेखर जोशी व हेमंत तायडे हे तीन कर्मचारी आल्यानंतर सर्व पोलिसांना मिळुन पावरावर नियंत्रण मिळवले. यानंतर पावरा याला रुग्णालयात दाखल करुन घेत उपचार सुरू करण्यात आले.