Thu, Dec 03, 2020 06:01होमपेज › Nashik › नंदुरबार : प्राचार्याचा कॉलेजातच गळफास

नंदुरबार : प्राचार्याचा कॉलेजातच गळफास, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

Last Updated: Oct 17 2020 2:09PM

प्राचार्य डॉक्टर रवींद्र शामराव चौधरीनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

नंदुरबार येथील जिजामाता फार्मसी कॉलेजच्या प्राचार्याने महाविद्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आहे. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अशी पहिलीच घटना आहे.

नंदुरबार येथील जिजामाता शैक्षणिक संस्था संचलित औषध निर्माण (फार्मसी) महाविद्यालयातील संगणक चालक तुषार कुलकर्णी हे काही कामानिमित्त शुक्रवार (दि.१७) रोजी दुपारी महाविद्यालयाच्या वरील मजल्यावर गेले होते. यावेळी त्यांना याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र शामराव चौधरी (वय ५६) यांनी महाविद्यालयातील वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक २ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

अधिक वाचा :नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने तरुणीची आत्महत्या

यानंतर तुषार कुलकर्णी यांनी या घटनेची माहिती धावत जावून संस्थेतील अन्य लोकांना दिली. यानंतर उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भापकर आणि त्यांचे सहकारी ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले. उपनगर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिराने या घटनेची नोंद करण्यात आली. तसेच प्राचार्य डॉक्टर रवींद्र चौधरी यांचे रात्री उशीराने शवविच्छेदन करण्यात आले. एका प्राचार्याने महाविद्यालयातच गळफास घेण्याची जिल्ह्यातील ही अशी पहिलीच घटना असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.  

या दरम्यान प्राचार्य रवींद्र चौधरी यांच्या खिशातून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्या चिठ्ठीत प्राचार्य चौधरी यांनी आर्थिक फसवणूक झाल्याचा ठपका ठेवला असून मुंबई व नाशिक येथील व्यक्तींकडे अंगुली निर्देश करणारे उल्लेख केले असल्याचे समजले आहे. हे आर्थिक व्यवहार काय होते आणि फसवणूक नेमकी काय झाली? असे विविध प्रश्नावर सध्या पोलिस तपास करत आहेत.  

अधिक वाचा गाडी चालवताना चालकाला लागली डुलकी, अपघातात ७ जणांचा मृत्यू

प्राचार्य चौधरी हे अत्यंत मनमिळावू म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांच्या वर्तणुकीतून तणाव असल्याचे कधी दिसले नव्हते, असे त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्राचार्य चौधरी हे बऱ्हाणपूर जिल्ह्यातील (मध्यप्रदेश) शाहपुर येथील मूळ रहिवासी होते. आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान शाहपूर गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयात छोटी शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.