Wed, Sep 23, 2020 03:10होमपेज › Nashik › न झालेल्या निवडणुकीची अजब आचारसंहिता

न झालेल्या निवडणुकीची अजब आचारसंहिता

Last Updated: Jul 15 2020 5:36PM

अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहननंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची न झालेल्या निवडणुकीच्या अजब आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्थगित होऊन साडेतीन महिने उलटून गेले आहेत. या निवडणुकीचे कारणाने त्यावेळी अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने जमा केले होते. पण आता तीन महिने ओलंडून गेले तरिही हे वाहन परत दिलेले नाही. याविषयी अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती आणि पं.स.सदस्य यांनी केलेल्या मिन्नतवाऱ्यांना कोणताही प्रतिसाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेला नाही. 

याबाबत अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती मनीषा राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना ई-मेलद्वारे तसेच कार्यालयात निवेदन सादर केलेले आहे. मात्र महिनाभरा नंतरही जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे पंचायत समितीच्या सर्वच पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केला आहे.

नंदुरबारमध्ये कोरोनाने ५ दिवसांत ४ जणांचा मृत्यू  

सभापती मनीषा वसावे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर वाहन हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्च महिन्यापासुन अधिग्रहित केलेले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक स्थगित होऊन साडे तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांचे अधिनस्त असलेले वाहन परत केलेले नाही.

त्यामुळे सभापती व उपसभापती यांना पंचायत समितीच्या दैनंदिन कामकाजा करिता तसेच विकासकामांच्या पाहणी करण्यासाठी येणे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक सर्व सामान्य जनतेचे काम करतांना मोठया अडचणी येत आहेत. विशेषतः कोरोना संकटाच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच परिस्थितीची पाहणी करणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे पदाधिकारीं बाबत जनतेत रोष व्यक्त होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जळगाव : महापौरांकडून 'त्या' मद्यपी कोरोना रुग्णांची खरडपट्टी

तसेच अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन परत करणेसाठी गट विकास अधिकारी सी.के.माळी यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधुन परिस्थितीची जाणिव करुन दिली आहे. तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप पर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. असेही निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन जनतेच्या दैनंदिन कामांसाठी तातडीने मिळावे अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे. गेल्या ४ महिन्यापासुन अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन नसल्यामुळे सभापती उपसभापती यांना नियमित कार्यालयात तसेच नंदुरबार येथे विविध कामांसाठी ये जा करणे कामी प्रत्येक

जळगाव : चौथ्या दिवशीही दोनशेच्यावर कोरोना रुग्ण

वेळेला खाजगी वाहन भाड्याने घेऊन जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहन नसल्याने तालुक्यात विविध कामांच्या तसेच जनतेच्या कामांसाठी दौरे करणे शक्य होत नाही आहे. कोरोनाच्या काळात लोकांमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटणे व धीर देणे जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही आहे. परिणामी पदाधिकारी यांचे बाबत लोकांत नाराजी पसरु नये. यासाठी जिल्हाधिकारी यांनी  तात्काळ पंचायत समितीचे शासकीय वाहन परत करावे.
- विजय सामा पाडवी, उपसभापती, पंचायत समिती अक्कलकुवा

 "