Sun, Jun 07, 2020 10:24होमपेज › Nashik › जळगावमध्ये नाट्यमय घडामोडी वेगाने; उमेदवारी रद्द झाल्याने वाघ समर्थकांत नाराजी

जळगावमध्ये नाट्यमय घडामोडी वेगाने; उमेदवारी रद्द झाल्याने वाघ समर्थकांत नाराजी

Published On: Apr 04 2019 3:05PM | Last Updated: Apr 04 2019 2:55PM
जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव लोकसभा मतदार संघात नाराजीचा खेळ सुरू आहे. एक तिकीट मिळाले की दुसरा नाराज असे सुरू असताना हे बंड थांबविण्यासाठी भाजपने जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलला आहे. त्यामुळे आमदार स्मिता वाघ यांनी तशी नाराजी आज आपल्या घरी कार्यकत्याशी व पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली. 

भाजपतर्फे मिळालेली उमेदवारी अचानकपणे रद्द होवून दुसऱ्या व्यक्तीस दिली गेल्यामुळे आ. स्मिता वाघ व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी आज सकाळी त्यांच्या घराजवळ एकत्र येऊन तीव्र नाराजी जाहीर केली.

आपण मतदारसंघात प्रचाराची जय्यत तयारी केली होती, कार्यकर्त्यांच्या टीम प्रचाराला लागल्या होत्या. पक्षाने आधी उमेदवारी जाहीर केली, नंतर अचानक काहीही कारण नसताना काढून घेतली, अशा शब्दात आ. वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपल्या नाराजीच्या भावना उघडपणे जाहीर केल्या. काही जणांनी तर पक्षाने या निर्णयाबद्दल खुलासा द्यावा, असा पवित्रा घेतला. एकूणच उमेदवारी रद्द झाल्याने उदय वाघ व आ. स्मिता वाघ यांचे समर्थक प्रचंड नाराज आले असून, ते आता पुढे काय भूमिका घेतात याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील उमेदवारीबाबत सगळ्याच पक्षांमध्ये सातत्याने नाट्यमय घडामोडी घडत असल्याने सामान्य जनतेत एकाचवेळी उत्सुकता आणि नाराजीची भावना आहे.

यावेळी बोलताना म्हणाले की, संघटनेचे काम करणारे आहे वयाच्या 9 वर्षापासून संघटनेचे काम करीत आहे. ऐनवेळी बदल्यामुळे यामागे जे षडयंत्र आहे त्याची त्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. भाजप येऱ्या- गैऱ्यांना तिकीट देतात आणि निष्ठावंतांना डावलतात त्‍यामुळे यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान का करावे म्हणून प्रश्न उपस्थित केला. 

यावेळी स्मिता वाघ म्हणाल्या की, सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच फोन येऊन गेला. ते म्हणाले की पक्षाचा निर्णय झाला आहे. पक्षाच्या वाढीसाठी काम करावे, तर गिरीश महाजन याचा सुद्धा नाराजी दूर करण्यासाठी फोन आला होता, असे स्मिता वाघ यांनी सांगितले.