Fri, Jul 10, 2020 09:10होमपेज › Nashik › तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या भावंडांना अटक 

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या भावंडांना अटक 

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:09PMनाशिक : प्रतिनिधी

लग्‍न करण्यास जबरदस्ती केल्याने जुने नाशिकमधील श्रद्धा गोरख चहाळे (17, रा. जुना कथडा) या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी दिनेश किशोर रेवर आणि राहुल किशोर रेवर या दोघा भावंडांना अटक केली आहे. श्रद्धा चहाळे हिने 29 मार्चला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.

त्यामुळे श्रद्धाचे वडील गोरख चहाळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात दिनेश आणि राहुल किशोर रेवर या दोघा भावंडांसह त्यांची आई धन्नो किशोर रेवर (तिघे रा. जुने नाशिक) यांच्याविरोधात श्रद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केलेली आहे. श्रद्धाने दिनेशसोबत लग्‍न करावे यासाठी तिघेही श्रद्धाला बळजबरी करीत होते. त्या छळाला कंटाळून श्रद्धाने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दिनेश आणि राहुल या दोघांना अटक केली आहे.