Fri, Sep 18, 2020 19:54होमपेज › Nashik › राज्यपाल कोशियारी त्र्यंबकचरणी लीन

राज्यपाल कोशियारी त्र्यंबकचरणी लीन

Published On: Sep 21 2019 1:34AM | Last Updated: Sep 20 2019 11:27PM

त्र्यंबकेश्‍वर : महाराष्ट्राचे नवनियुक्‍त राज्यपाल भगतसिंह कोशियारी भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाताना. (छाया : ज्ञानेश्‍वर महाले)त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी त्र्यंबकेश्‍वर येथे येऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत कोणीही राजकीय लवाजमा नव्हता. फक्‍त मुंबई, नाशिक आणि स्थानिक उच्चस्तरीय अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्‍वर येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचे सचिव डॉ. प्रवीण निकम यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास चोथे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल (पप्पू) शेलार, सागर उजे, रवींद्र (बाळा) सोनवणे, कुणाल उगले, काळू भांगरे आदी नगरसेवक उपस्थित होते. 

दरम्यान, राज्यपाल यांनी सोवळे परिधान करून राज्यपालांनी देवासमोर सभामंडपात मनोभावे रुद्राभिषेक केला. यावेळी पूजेचे पौराहित्य देवस्थानचे विश्‍वस्त तथा पुरोहित प्रशांत ऊर्फ गंगागुरू गायधनी यांनी केले. त्यांच्यासमवेत पुरोहित अक्षय लाखलगावकर यांनीही पूजा सांगितली. शेवटी आरती पुष्पांजली होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्य, धनसंपदेसाठी संकल्प केला.

यावेळी अतिरिक्‍त जिल्हा पोलीसप्रमुख शर्मिष्ठा वालावलकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, येवल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, त्र्यंबकेश्‍वरचे तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार रामकिसन राठोड, सुदेश निरगुडे (प्रशासन), नायब तहसीलदार सुरेश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास कर्पे, ज्ञानेश्‍वर वारे, देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी राजाभाऊ जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, जनसंपर्क अधिकारी रवि जाधव आदी उपस्थित होते.