नाशिकरोडमध्ये जर्मन दाम्पत्य त्यांच्या गाडीसह आल्याने खळबळ!

Last Updated: Mar 26 2020 1:11PM
Responsive image


नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सर्व जगात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोरोना’ने महाराष्ट्रातही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. सुदैवाने नाशिकमध्ये एकही कोरोगाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. त्यातच गुरूवारी (दि.२६) पहाटे जर्मन दाम्पत्य त्यांच्या देशातील वाहनासह उपनगर परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

अधिक वाचा :  मालेगाव : सामान्य रुग्णालयात आमदारांसमक्ष वैद्यकीय अधीक्षकांना धक्काबुक्की

नागरिकांनी तत्काळ शासकीय यंत्रणांनासोबत संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव जर्मन दाम्पत्याशी चौकशी केली. चौकशीतून संबंधीत दाम्पत्य हे जगभ्रमंतीसाठी जर्मनी बाहेर पडले असून, ‘कोरोनाच्या’च्या पार्श्वभूमीवर त्यांना मायदेशी बोलविण्यात आले आहे. त्यानुसार ते मुंबई येथील जर्मन दुतावासात जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी जर्मन दाम्पत्याची शहानिशा करून त्यांना मुंबईच्या दिशेने रवाना केले. जर्मन दाम्पत्य गेल्यानंतर स्थानिक नागरिकांसह शासकीय यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अधिक वाचा : जोर-बैठका, उठाबशा अन् दंडुके