Wed, Dec 02, 2020 09:07होमपेज › Nashik › नंदुरबार मेडिकल कॉलेजसाठी १९५ कोटींचा निधी मंजूर 

नंदुरबार मेडिकल कॉलेजसाठी १९५ कोटींचा निधी मंजूर 

Last Updated: Jul 04 2020 2:39PM

खासदार डॉ. हिना गावितनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी १९५ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे. केंद्राकडून निधी मंजूर झालेले महाराष्ट्रातील हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असून त्याच्या उभारणीच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.

वाचा : 'खिलाडी'ची हवाई भरारी वादात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश 

शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी दिली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते. खासदार हिना यांनी याप्रसंगी सांगितले की, नंदुरबार येथील या मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जागा टोकर तलाव रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आली असून टोकर तलाव रस्त्यावर १६ पॉईंट ६३ हेक्‍टर जागा मिळाली आहे. मेडिकल कॉलेजसाठी एकूण ३२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १९५ कोटी केंद्र सरकारने मंजूर केले आहे. नंदुरबार येथे मेडिकल कॉलेज झाल्यास आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्याला यश आले असल्याचा दावा खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेतून केला. 

वाचा :जिल्ह्यात 13 रुग्णांचा मृत्यू

तसेच देशभरातील आदिवासी भागातील एकूण ४२ मेडिकल कॉलेजसाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला. त्यात महाराष्ट्रातील एकमेव नंदुरबारचा समावेश आहे. डॉक्टर,  प्राध्यापक, सहप्राध्यापक यांची भरती केली जावी. तसेच पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविली जावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्या त्रुटी काढण्यात आल्या होत्या त्या दूर करण्यात येत असल्याने लवकरच मार्ग मोकळा होईल, असे खासदार गावित यावेळी म्हणाल्या.