Mon, May 25, 2020 20:18होमपेज › Nashik › इंग्रजांनी चुकीचा इतिहास मांडला

इंग्रजांनी चुकीचा इतिहास मांडला

Published On: Dec 18 2017 2:39AM | Last Updated: Dec 17 2017 11:22PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीचे बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला.

श्री मोहिनीराज भक्त मंडळ नाशिकतर्फे वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना श्री मोहिनीराज जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि.17) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उत्पात बोलत होते. ते म्हणाले, जगाला अभिमान वाटावा असा भारताचा इतिहास आहे. इतिहासाची पुन्हा एकदा नव्याने मांडणी होणे गरजेचे आहे. तरुणपिढीपुढे देशाचा खरा इतिहास आला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी भागवताचार्य उत्पात यांच्या हस्ते रामचंद्र धर्माधिकारी, दिगंबर कुलकर्णी, वासुदेव कुलकर्णी, दामोदर गर्गे, सुमन गायधनी, नारायण गायधनी, शंकुतला चंद्रात्रे, विद्या मोहोळे, पुष्पा देव, नलिनी झेंडे, वसंत गर्गे, निर्मला गायधनी, रामचंद्र जोशी, प्रभावती गायधनी, वसंत गायधनी आदींना शाल व स्मृतिचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष किशोर गायधनी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंडळाचे विश्‍वस्त यादवराव शुक्ल, महिला अध्यक्षा चित्रा देव, दत्तात्रय गायधनी, विनायक शुक्ल, विजय डोंगरे, रमेश देव, सुनीता गायधनी, सुवर्णा कुलकर्णी आदींसह श्री मोहिनीराज भक्त परिवार उपस्थित होता.