Tue, May 26, 2020 13:20होमपेज › Nashik › नाशिकरोडला शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन  

नाशिकरोडला शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन  

Published On: Aug 27 2019 1:49AM | Last Updated: Aug 26 2019 10:54PM
चेहेेेडी  : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने नाशिकरोड येथे सोमवारी (दि.26) शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक रस्त्यावर उतरले होते. 

बिटको महाविद्यालयापासून अर्धनग्न  होऊन मोर्चा काढण्यात आला. अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनिअर कॉलेज यांना अनुदानपात्र घोषित करून 20 टक्के अनुदान द्यावे, गेल्या 15 दिवसांपासून शिक्षकांचे  वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरूच आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बिटको महाविद्यालयापासून अर्धनग्न  होऊन मोर्चा काढण्यात आला. उपआयुक्त प्रतिभा संगमनेरे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी कृती समितीचे राज्य सचिव  गोरख कुळधर,  विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे,  कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, नाशिक जिल्हाध्यक्ष भरत भामरे, धुळे जिल्हाध्यक्ष उदय तोरावणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे राजाराम गायकवाड,  कृती समितीचे उपाध्यक्ष मनोज वाक्चौरे, सचिव सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे शरद काकुस्ते, कैलास  पोरजे, हरिश्चंद्र शेजवळ, कन्हैया पगार, चंद्रकांत गिते,  गोकुळ महाले, लहू ठोसर , अविनाश कांगणे, माधव भुजाडे, सुभाष पवार, राजाराम बोरसे, अरुण कोठावदे, अभिजित नेरकर,  निकिता पवार, राकेश निकम, अरुणा सुतार, निशा पाटील, मनीषा पवार, सविता देसले, सोनल पाटील सहभागी झाले होते. तसेच, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष के. के . अहिरे, मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, कार्यवाह आर. डी. निकम, एनडीएसटी सोसायटीचे अध्यक्ष संजय देवरे, सुरेंद्र बच्छाव, नरेंद्र ठाकरे, अनिल देवरे, पी.एल. ठोके, गोरख कुलधर, महादेव घोडके, सुभाष भामरे यांनी मुख्याध्यापक संघाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दिला आहे.