Tue, Nov 19, 2019 00:56होमपेज › Nashik › शिक्षकदिनी पाळला काळा दिवस

शिक्षकदिनी पाळला काळा दिवस

Published On: Sep 06 2019 1:44AM | Last Updated: Sep 05 2019 11:18PM
मुकणे : वार्ताहर

राज्य शासनाने विनाअनुदानित शाळांना 20 वर्षांनंतरही प्रचलित नियमानुसार अनुदान दिले नाही. या निषेधार्थ इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) येथे आजचा 5 सप्टेंबर शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

राज्यातील सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 1 सप्टेंबर 2019 पासून 80 टक्के अनुदान अपेक्षित असताना फक्त 40 टक्के अनुदान देऊ करून शासनाने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या सर्व विनाअनुदानित शाळांवरील अन्यायकारक निर्णय व शिक्षकांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध म्हणून 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून तसेच काळे कपडे व काळ्या फिती लावून संपूर्ण शाळेतर्फे निषेध व्यक्त करीत शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक देवीदास कडू, कन्हैया पगार, संजय भदाणे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर सौंदाणे, देवराम खांडबहाले आदी उपस्थित होते. शाळेतील नामदेव नाठे, राजेंद्र खोंडे हे मुंबई येथील आझाद मैदान महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनात सहभागी आहेत. मुंबई येथे 5 ऑगस्टपासून प्रचलित नियमानुसार अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आजचा शिक्षक दिन आझाद मैदान येथे काळा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विनाअनुदानित शाळेत काळा दिवस म्हणून पाळला आहे.