Wed, Jun 03, 2020 21:49होमपेज › Nashik › लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर ७२ वर्षानी प्रथमच महिलाराज

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर ७२ वर्षानी प्रथमच महिलाराज

Published On: Aug 29 2019 12:36PM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप आणि उपसभापती पदी प्रिती बोरगुडेलासलगाव : वार्ताहर  

नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज पाटील गटाकडून सभापती म्हणून सुवर्णा जगताप तर थोरे गटाकडून उपसभापती पदी प्रिती बोरगुडे म्हणून यांची निवड करण्यात आली. सुवर्णा जगताप यांची लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापतीपदी निवड झाली आहे. भाजपच्या रूपाने ७२ वर्षानी प्रथम महिला सभापती म्हणून विराजमान झाल्या आहे.

आज (दि. २९) रोजी सकाळी बाजार समितीच्या आवारात जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बोलावलेल्या बैठकीत सभापती पदासाठी सुवर्णा जगताप यांचा अर्ज दाखल असून उपसभापती पदासाठी प्रीती बोरगुडे यांचा अर्ज दाखल झाल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रिया वेळेत यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही सदस्याचा अर्ज नसल्याने या दोघांची सभापती व  उपसभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी बाजार समितीचे सदस्य नानासाहेब पाटील, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, भास्करराव पानगव्हाणे, मोतीराम मोगल, शिवनाथ जाधव, रमेश पालवे, अनिता सोनवणे, सचिव नरेंद्र वाढवने उपस्थित होते. 

सभापती व उपसभापती निवड झाल्याचे समजताच समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी सुरेशबाबा पाटील, माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, नामकोचे संचालक प्रकाश दायमा, संतोष पलोड, शिवाजी ढ़ेपले, संजय पाटील, दत्तात्रय डुकरे, राजाभाऊ शेलार, उत्तम शिंदे, अरुण भांबारे, राजेंन्द्र बोरगुडे, अण्णासाहेब बोरगुडे आदी मोठया संख्येने उपस्थित होते.