Thu, Sep 24, 2020 10:08होमपेज › Nashik › धुळ्यात संशयास्पद मृत्यू, हात पाय बांधून विहिरीत टाकले

धुळ्यात संशयास्पद मृत्यू, हात पाय बांधून विहिरीत टाकले

Last Updated: Jan 22 2020 7:31PM

संग्रहित छायाचित्रधुळे : प्रतिनिधी 

धुळे तालुक्यातील खंडलाय या शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मयताचे हात व पाय दोरीने बांधलेले असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. पोलिस पथक घटनास्थळी पुरावे शोधण्याचे काम करीत आहे.

अधिक वाचा : धुळे : नगरसेवक नातेवाईकाचा खून करणारे आरोपी जेरबंद

खंडलाय गावात तालुका पोलिस ठाण्याचे पथक दोन दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारी प्रकरणाचा तपास करीत होते. गावात विचारपूस सुरू असतानाच विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मधुकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत पोलिसांना हात व पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे ही माहिती तालुका पोलिसांना दिल्याने पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी पोहोचले. 

अधिक वाचा : जळगाव : आश्रमशाळेत दोन सख्या भावांचा मृत्यू

पोलिसानी मयताची ओळख पटवली असून त्याचे नाव प्रकाश मालजी शिंदे (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले. प्रकाश शिंदे हे पत्नी पासून विभक्त राहत असून ते शेतात राहत होते. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने कुणी मारले याविषयीचे पुरावे शोधण्याचे काम सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होते. तर प्रथम दर्शी अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात येणार असून प्राथमिक तपासाच्या नंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 "