Fri, Jun 05, 2020 04:51होमपेज › Nashik › एकाच कुटुंबातील तिघांची सामुहिक आत्महत्या

एकाच कुटुंबातील तिघांची सामुहिक आत्महत्या

Published On: Mar 30 2019 12:10PM | Last Updated: Mar 30 2019 12:10PM
जळगाव : प्रतिनिधी

भडगाव  शहरातील ९ वर्षीय बालकाचा मागील आठवड्यातच पाचोरा येथे निर्घृण हत्या झाली होती. याच परिवारातील  कुटुंबातील तिघांनी गळफास घेत सामुहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज, शनिवार (दि.३०) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. 

मागील आठवड्यात ९ वर्षीय बालक सय्यद इसम सय्यद बाबू याचा निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील राजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता. आज त्याच्याच आई, वडील आणि बहिणीने सामूहिक सामूहिक आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

आज सकाळच्या सुमारास सय्यद कुटुंबीय घराबाहेर न आल्याने शेजारील नागरिकांना शंका आली. म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावून पहिला असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता या तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेत. त्यानंतर याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यामुळे ही आत्महत्या की, घातपात? याबाबत शंका उपस्थित होत आहे.