Fri, Jun 05, 2020 04:59होमपेज › Nashik › धामणगावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या

धामणगावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Mar 20 2019 1:15AM | Last Updated: Mar 20 2019 1:07AM
घोटी : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने  गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली आहे. शरद भाऊ उघडे (मूळ रा. खदकेद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

शरदने पहाटेच्या दरम्यान आश्रमशाळेसमोर असलेल्या झाडाला दोर लावून गळफास घेतल्याची बाब आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांनी पाहिली. त्यांनी तत्काळ शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. यानंतर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खैरनार यांनी घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, शीतल गायकवाड, संतोष दोंदे, लहू सानप यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरदचे दहावीचे पेपर सुरू असून, दोन पेपर शिल्लक होते. मात्र, अचानक आत्महत्या केल्याने चर्चेला उधाण आले असून, कारण समजू शकले नाही. मयत शरदच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.