Wed, Jun 03, 2020 21:55होमपेज › Nashik › सिन्‍नरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर छापा; दोघे ताब्यात

सिन्‍नरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर छापा; दोघे ताब्यात

Published On: Oct 07 2018 11:49PM | Last Updated: Oct 07 2018 11:49PMसिन्‍नर : पुढारी ऑनलाईन

सिन्नर तालुक्यातील निर्‍हाळे शिवारात घोटेवाडी रस्त्यावर एका बंगल्याच्या  तळघरात अवैधरित्या सुरू असलेला दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्‍ध्वस्त केला. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  रविवार दि. ७ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सिनेस्टाइल सुरू असलेल्या या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणावरून सात ते आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

बंगल्याच्या बेडरूममध्ये दिवाण व दिवाणच्या खाली तळघरात जाण्यासाठी मार्ग करण्यात आला होता. ललित भाऊसाहेब यादव व  प्रफुल्ल भाऊसाहेब यादव अशी संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, तसेच दीपक आव्हाड, अमित गांगुर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईत अवैध कारखान्यात दमन येथून आणलेली दारू तसेच नव्याने दारू तयार करून  त्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दारूच्या कंपन्यांची लेबल लावून ही दारू विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार  तपासात समोर आला आहे.